सुपरसिरीजच्या उपांत्य फेरीत सायना, श्रीकांत

saina
दुबई – सायना नेहवाल आणि के. श्रीकांतने बीडब्ल्यूएफ जागतिक सुपरसिरीज फायनल बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दोघांच्या उपांत्य फेरीच्या लढती आज होतील.

तिन्ही विजय नोंदवत ‘ग्रुप ए’मध्ये सायनाने फॉर्म राखला. चौथ्या मानांकित सायनाने आठव्या मानांकित दक्षिण कोरियाच्या येउन जू बायेचा १५-२१, २१-७, २१-१७ पराभव केला. यापूर्वीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या सुंग जू हुआनला २१-१२, २१-१८ नमवले होते. अन्य लढतीत सहावा मानांकित श्रीकांतनेही ‘ग्रुप बी’च्या दुस-या लढतीत आठवा मानांकित इंडोनेशियाच्या टॉमी सुगियाटरेला २१-१८, २१-१३ नमवले.

Leave a Comment