इपीएफओचा व्याजदर यंदाही ८.७५ टक्के राहणार

epfo
नवी दिल्ली – केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीला (इपीएफओ) २०१४-१५ मध्ये ८.७५ टक्के व्याजदर मिळणार आहे, अशी घोषणा केली. याचा लाभ पाच कोटी भागधारकांना होणार आहे.

८.७५ टक्के व्याज देण्याची शिफारस कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने केली होती. ती केंद्रीय अर्थखात्याने मान्य केली, असे सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment