
कराची – पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिक याने भारताची महिला टेनिसस्टार सानिया मिर्झा हिच्यासोबतचे आपले वैवाहिक जीवन सुखी असून आम्हा दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
सानियासोबत कोणत्याही प्रकारची समस्या नाही – मलिक
शोएब मलिकने येथील एका स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, अजूनही सानिया आणि मी दुबईत एकत्र राहतो आणि एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवितो. आम्ही दोघेही व्यावसायिक खेळाडू असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त वेळ आपले सामने खेळण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. याचा अर्थ आमचा विवाह धोक्यात आहे, असा होत नाही.
