बाळासाहेब ठाकरे यांच्यावरचा लघुपट २३ जानेवारीला येणार

bala
मुंबई – हिंदू हृदय सम्राट व शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसर्‍या स्मृतीदिनाच्या निमित्ताने बाळासाहेबांवरील चित्रपट त्यांच्या जयंतीला म्हणजे २३ जानेवारीला प्रदर्शित केला जात असल्याचे संकेत शिवसेनेकडून दिले गेले आहेत. सोशल मिडीयावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सूरू झाली असून सेना प्रमुखांचे फोटो येथे झळकले आहेत. त्यात -तुम्ही बोलावलत, मी येतोय, वाट पहा २३ जानेवारीला- असा मजकूरही दिला गेला आहे.

सेनेचे राज्यसभेतील खासदार व सेनेचे मुखपत्र सामनाचे संपादक संजय राऊत यांनी यासंदर्भात बोलताना हा चित्रपट आहे इतकेच स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा लघुपट असून त्यात सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा पुढकार आहे. नामवंत मराठी व हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शकांनी तो तयार केला असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र त्यापेक्षा अधिक कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

Leave a Comment