सुपर नॅनो २५ लाखात

nano
भारतीयांची आवडती, मस्त आणि स्वस्त तशीच आटोपशीर कार म्हणून ओळख असलेल्या नॅनोला नवे रूपडे देण्याचे काम कोईमतूर येथील जे.ए. मोटरस्पोर्टने केले असून त्यासाठी त्यांना २५ लाख रूपये खर्च आला आहे. शहरांतर्गत प्रवासासाठी अतिशय उपयुक्त ठरलेली नॅनो यामुळे सुपर नॅनो कार बनली आहे. नॅनोचे कमी वजन, मागे बसविले गेलेले इंजिन अशी त्याची वैशिष्ट्ये कायम राखतानाच चालकाला ही कार ड्रायव्हिंगचा अनोखा अनुभव देऊ शकणार आहे. यासाठी कारची बॉडी, टायर्स यांत मात्र कांही बदल करण्यात आले असून त्यामुळे ही गाडी १९० किमीच्या वेगाने पळू शकणार आहे. त्यासाठी चासीसचे कामही केले गेले आहे.

भारताची सुपर नॅनो फास्टेट हॉट हच कार बनविण्यात जेए मोटर्सने यश मिळविले असून ती आता रेस ट्रॅकवर ड्राईव्ह करण्यासाठीही योग्य बनविली गेली आहे. ही कंपनी कार रेसिगसाठी खास बनविल्या जात असलेल्या कारचे कांही स्पार्टसही तयार करते असेही समजते.

Leave a Comment