गारपीटग्रस्तांना आज मिळू शकतो दिलासा

rain
नागपूर – आज हिवाळी अधिवेशनात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा होणार असून गारपीटग्रस्त भागाच्या दौऱ्यादरम्यान तात्काळ पॅकेजची घोषणा करण्याचे आश्वासन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तब्बल ३५ हजार हेक्टर शेतीचे नुकसान नाशिक जिल्ह्यातील गारपिटीत झाले आहे.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना प्रसंगी सरकार कर्ज काढेल, पण आवश्यक संसाधनांची पूर्तता करू असा दिलासा दिला आहे. तसेच पिकविम्यातही आमूलाग्र बदल करण्याचे आश्वासन यावेळी फडणवीस यांनी दिले.

काल दिंडोरीमध्ये दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्ध्वस्त द्राक्ष बागांची पाहाणी केली होती. यावेळी द्राक्ष उत्पादकांनी द्राक्ष रस्त्यावर फेकत निषेधही व्यक्त केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिंदवडमध्ये गारपीटग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांना मदतीचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या याच आश्वासनानंतर रूई गावातील गारपीटग्रस्तांनी आत्मदहनाचा इशारा मागे घेतला आणि आंदोलनही थांबवले आहे.

Leave a Comment