मकाउ ओपनचे जेतेपद पी.व्ही.सिंधूच्या नावे

sindhu
मकाउ – मकाऊ ग्रॉँप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद भारताच्या पी. वी. सिंधूने राखले असून दक्षिण कोरियाच्या किम यो मिनचा २१-१२, २१-१७ असा तिने पराभव केला.

या स्पर्धेत असलेला दणदणीत फॉर्ममध्ये असलेल्या सिंधूचे हे हंगामातील पहिले जेतेपद ठरले आहे. यावर्षी ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेल्या सिंधूला ग्रॉँपी गोल्ड आणि सुपरसिरीजमध्ये फारसे यश नव्हते आले. मात्र येथे तिने उणीव भरून काढली. या स्पर्धेत दुसरी सीडेड सिंधूला दुस-या फेरीत आणि उपांत्यपूर्व फेरीत तीन गेमवर झुंज द्यावी लागली होती. मात्र उपांत्य फेरीसह अंतिम फेरी तिला दोन गेममध्येच जिंकता आली. सिंधूच्या याबरोबरच यावर्षातील स्पर्धा संपल्या आहेत. आता ती थेट पुढील वर्षी मलेशियामध्ये खेळेल.

Leave a Comment