कैलास मानसरोवरचा नवा रस्ता पुढील वर्षात सुरु

kailash
चीन सरकारच्या साथीने आणि सहमतीने सिक्कीममधील नथुला खिंडीतून कैलास मानसरोवरासाठीचा नवा रस्ता बांधण्याचे काम जोरात सुरू असून पुढील वर्षात हा रस्ता खुला होईल असे समजते. १८ सप्टेंबर रोजी चीन व भारत या दोन्ही देशात झालेल्या द्विपक्षीय समझोत्यात या नव्या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली गेली होती.

दरवषी हजारो हिंदू भाविक कैलास यात्रेला जात असतात. पूर्वीचा रस्ता उत्तराखंड मधून होता. या मार्गावर प्रचंड पर्वत, खोल दर्‍या, निसरडे रस्ते आणि बर्फाळ हवेचा सामना यात्रेकरूंना करावा लागतो. लिपुलेख पासून पुढे चीनच्या हद्दीत जाता येते.१ हजार किलोमीटरचा हा मार्ग असून त्यातील ७०० किमी भारतात तर ३०० तिबेट चीन मध्ये आहेत.

नथुला खिंडीतून होत असलेला नवीन रस्ता अनेक सुविधांनी युक्त आहे. नथुला खिंडीतून तिबेटमधील मानसरोवरापर्यंत थेट मोटर रस्ता होत आहे. याचा फायदा वृद्ध यात्रेकरूंना होणार आहे. प्रवासाचा वेळ कमी होणार आहे त्याचबरोबर पावसातही हा रस्ता सुरक्षित आहे. समुद्र सपाटीपासून १५ हजार फुटांवर पवित्र मानसरोवर आहे. प्रत्येक वर्षी जून ते सप्टेंबर या काळात कैलास मानसरोवर यात्रेचे आयोजन विदेश मंत्रालयातर्फे केले जाते आणि या यात्रेसाठी दरवर्षी १०८० यात्रेकरूंनाच परवानगी दिली जाते. नवीन मार्गामुळे मोठ्या संख्येने यात्रेकरू जाऊ शकणार आहेत.

Leave a Comment