जानेवारीत येणार १० रूपयांच्या प्लॅस्टीक नोटा

io-ru
गेले अनेक दिवस केली जात असलेली १० रूपयांच्या प्लॅस्टीक नोटांची प्रतीक्षा नवीन वर्षात संपत असून जानेवारीतच या नव्या नोटा चलनात आणल्या जाणार आहेत. सुरवातीला कांही निवडक शहरातच त्या उपलब्ध केल्या जात आहेत असे रिझव्हॅ बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नोटा छपाईचे काम रिझर्व्ह बँकेला करावयाचे असले तरी त्यासाठी केंद्राकडून मंजुरी मिळावी लागते. केंद्राने या नोटांच्या छपाईसाठी हिरवा कंदिल दाखविल्याने हे काम सुरू केले जात आहे असे सांगण्यात येत आहे. सुरवातीला ५ अब्ज रूपयांच्या नोटा छापल्या जाणार आहेत. त्याला नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहिल्यानंतर मोठ्या रकमांच्या प्लॅस्टीक नोटा छापण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे असेही सांगितले जात आहे.

कागदी नोटा मळतात, फाटतात, पाण्यात भिजल्या तर खराब होतात. या नोटा छापण्यासाठी खर्चही जास्त येतो. दररोजच रिझव्हॅ बँकेकडे अशा लाखो रूपयांच्या फाटलेल्या मळलेल्या नोटा बदलण्यासाठी येतात. नंतर या नोटा नष्ट केल्या जातात. जितक्या नोटा नष्ट केल्या जातात तितक्या नवीन छापल्या जातात. ही सर्वच प्रक्रिया खर्चिक आहे. त्याऐवजी प्लॅस्टीक नोटा वापरल्या तर त्या जादा टिकणार आहेत. मात्र कागदी नोटा दुमडता येतात, खिशात पाकिटात सहज ठेवता येतात, नोटांची गड्डी सहज सांभाळता येते त्यामुळे कागदी नोटांना नागरिकांची पसंती आहे. प्लॅस्टीक नोटाही पातळ आणि दुमडता येणार्‍या असतील तर त्यांनाही नागरिक स्वीकारतील असे कांही तज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment