मुंबईत होणार २,२९८ झाडांची कतल

metro
मुंबई – ’मेट्रो-तीन’ला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)कडून हिरवा कंदील मिळाला असला तरी या प्रकल्पामुळे गोरेगावमधील आरे कॉलनीतील हिरवाईवर संक्रांत येणार आहे. या प्रकल्पाच्या मार्गात येणार्या २,२९८ झाडांची कतल करावी लागणार असल्याने या वृक्षांना वाचवण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी एकत्रित प्रयत्न चालवले आहेत. वृक्षतोड करण्यापेक्षा येथील प्रस्तावित मेट्रो यार्डाची जागा अन्यत्र स्थलांतरित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम उघडण्यात आली आहे.

Leave a Comment