म्हाडाच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकास धोरणास मंजुरी

mhada
मुंबई – हाऊसिंग स्टॉक मिळवण्याच्या उद्देशाने म्हाडाच्या वसाहतींमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने वर्षभरापूर्वी आणलेल्या सुधारित धोरणाला आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. या धोरणांतर्गत म्हाडाकडे ५०हून अधिक प्रस्ताव आले असून, त्यापैकी १२ प्रस्तावांना मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील या प्रस्तावित प्रकल्पांचा विचार करता पुढच्या दोन-तीन वर्षांत सर्वसामान्यांच्या लॉटरीसाठी सुमारे चार हजार घरे उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. विकास नियंत्रण नियमावलीतील सुधारित ३३ (५) अन्वये मंजूर झालेल्या १२ प्रस्तावांमध्ये एमएचबी कॉलनी (बोरीवली) आणि पीएमजीपी कॉलनी (अंधेरी) येथील १५ ते १६ इमारतींच्या ’क्लस्टर’ प्रस्तावांचा समावेश आहे. अन्य दहा प्रस्ताव हे सोसायट्यांचे आहेत. या व्यतिरिक्त अभ्युदय नगर (काळाचौकी) व निर्मलनगर (बांद्रा) येथील प्रस्तावही मंजुरीच्या मार्गावर आहेत.

Leave a Comment