भाजपवर इतक्यातच टीका करणार नाही : अजित पवार

ajit-pawar
सातारा – भाजप सरकारला न मागताच बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा करणार्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार अजूनही भाजपशी ‘तडजोडी’च्या आशेने फडणवीस सरकार विरोधात भूमिका घेण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत. ‘भाजपचे राज्यातील सरकार नवीन आहे. त्यांच्यावर आम्ही आत्ताच टीका करणार नाही. शंभर दिवसांत त्यांना जे करायचे ते करू द्या, मात्र शेतकर्यांॅचे प्रश्न सुटले पाहिजेत,’ अशी अपेक्षा पवार यांनी सोमवारी व्यक्त केली. राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेवर मात्र त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. सातारा जिल्ह्यातील शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या गळीत हंगामा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

Leave a Comment