इसिस देते आहे लहान मुलांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण

isis
बगदाद – इस्लामिक स्टेट फॉर इराक ऍण्ड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेने एक नवा व्हिडीओ जारी केला आहे. त्यात लहान मुलांना एके-४७ चालविण्याचे प्रशिक्षण देताना दाखविण्यात आले असून, प्रशिक्षणार्थी मुले कझाकिस्तानची असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या मुलांना लहान वयातच अरबी भाषेत लिहिण्यावाचण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. इसिसच्या या व्हिडीओमध्ये मुले स्वयंचलित शस्त्रास्त्रांशी खेळतानाही दाखवण्यात आले आहे. इसिसची शाखा असलेल्या ‘अल हयात मीडिया सेंटर’ने हा व्हिडीओ जारी केला असून, त्यामध्ये कझाक आणि अरबी भाषेतील संभाषण आहे. शिवाय इंग्रजी भाषेतील सबटायटल्सच्या माध्यमातून भाषांतरही देण्यात आले आहे.

Leave a Comment