सोन्याच्या पादत्राणे स्वीकारण्यास भोसलेंचा नकार

arvind-bhosale
सिंधुदुर्ग – शिवसेनेचे नवनियुक्त प्रवक्ते अरविंद भोसले यांनी शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले नारायण राणे यांचा पराभव होईपर्यंत अनवाणी राहाण्याची प्रतिज्ञा यशस्वीपणे पूर्ण केली. या सन्मानार्थ पक्षाकडून देण्यात येणारी सोन्याच्या पादत्राणे स्वीकारण्यास अरविंद भोसले यांनी नकार दिला आहे. सोन्याच्या चपलांवर पक्षासाठी प्राण गमावणारे रमेश गोवेकर यांचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांची ही भूमिका मान्य केली आहे.

नारायण राणे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणारे गोवेकर यांनी राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्या सोबत जाण्यास नकार दिला. आपण कदापि शिवसेना सोडणार नाही, असे त्यांनी ठासून सांगितले. त्यानंतर गोवेकर यांनी विधानसभा निवडणुकीत राणे यांच्या विरोधात काम केले. प्रचारकाळात ते अचानकपणे बेपत्ता झाले होते. १७ नोव्हेंबर २००५ रोजी मालवण किल्ल्यानजीक एक मृतदेह आढळून आला. तो मृतदेह गोवेकर यांचाच आहे, असा दावा गोवेकर कुटुंबीयांनी केला. मात्र, न्यायालयात ते अद्याप सिद्ध झाले नाही. त्यामुळे रमेश गोवेकर नक्की कुठे आहेत, हे अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही.

Leave a Comment