बूर्ज खलिफावर काढला सेल्फी

burj-khalifa
लंडन – गेराल्ड डोनोव्हन या ४७ वर्षांच्या ब्रिटिश फोटोग्राफरने ‘बूर्ज खलिफा’ या जगातील सर्वात उंच इमारतीवरून ‘सेल्फी’ काढून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

डोनोव्हन सध्या ‘दुबई ३६०’ या प्रकल्पासाठी छायाचित्रण करीत असून ‘दुबई ३६०’ या प्रकल्पाचा उद्देश बूर्ज खलिफा या २७२२ फूट उंचीच्या इमारतीवरून ३६० अंशांमध्ये काढलेले फोटो आणि व्हिडीओच्या मदतीने दुबईची ‘व्हर्च्युअल’ सफर घडवून आणणे हा आहे. या प्रकल्पासाठी छायाचित्रण झाल्यानंतर डोनोव्हनने ‘बूर्ज खलिफा’ या टोलेजंग इमारतीवरून ही ‘सेल्फी’ काढली. आयफोनच्या ऍपद्वारे नियंत्रित केल्या गेलेल्या ‘रिको थॅटा’ या विशेष पॅनोरॅमिक कॅमेर्या च्या साहाय्याने त्यांनी ही प्रतिमा टिपली. त्यांची ही खास ‘सेल्फी’ सध्या सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय होत आहे.

Leave a Comment