मेट्रो-२ आणि मेट्रो-५ ला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

metro
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीएच्या अधिका-यांदरम्यान गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मेट्रो २ आणि मेट्रो ५ या प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला आहे. या दोन्ही प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.

मानखुर्द-वांद्रे-चारकोप असा मेट्रोचा दुसरा टप्पा असून या प्रकल्पासाठी २५ हजार ६०५ कोटीच्या निधीसाठी मान्यता देण्यात आली आहे. तर वडाळा, घाटकोपर, ठाणे-कासारवडवली या मार्गावरील मेट्रो ५ च्या प्रकल्पासाठी १९ हजार ९७ कोटी रुपयाच्या निधीसाठी मान्यता देण्यात आली आहे.

Leave a Comment