रैना आणि धवन देखील सामील झाले अभियानात

suresh-raina
लखनौ – भारतीय क्रिकेट संघातील तडाखेबाज फलंदाज सुरेश रैना आणि शिखर धवन बुधवारी हातात झाडू घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात सामील झाले व शहर स्वच्छ करण्यासाठी रस्त्यावर उतरले. गाझियाबादमधून स्थानिकांच्या मदतीने रैनाने या स्वच्छता अभियानाची सुरुवात केली.

स्वच्छता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे आणि हे स्वच्छता अभियान केवळ एक स्वप्न राहता देशव्यापी चळवळ व्हावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या अभियानाशी जुळल्यानंतर मला अतिशय आनंद होत आहे. प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी होऊन आपल्या क्षेत्राच्या स्वच्छतेची जबाबदारी घ्यायला हवी, असे अभियानानंतर हा अष्टपैलू खेळाडू म्हणाला.

या स्वच्छता अभियानात रैना आणि धवनच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शहर स्वच्छ केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीदिनापासून सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’त ज्या नऊ जणांना सामावून घेतले होते, त्यात क्रिकेटपटूंचाही समावेश होता. भारतरत्न सचिन तेंडुलकर अभियानाच्या सुरुवातीलाच स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरला होता. त्याच्यापाठोपाठ भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झादेखील या स्वच्छता अभियानात सहभागी झाली होती आणि बर्यानच जणांना सहभागीही करून घेतले होते.

Leave a Comment