
सोची(रशिया) – भारताच्या विश्वनाथन आनंदने जगज्जेतेपदाच्या लढतीतील पहिला डाव बरोबरीत सुटल्याने काही प्रमाणात सुटकेचा निश्वास सोडला आहे.
पहिला डाव बरोबरीत सुटल्याने आनंदने सोडला सुटकेचा नि:श्वास
पांढ-या मोह-यांच्या सहाय्याने खेळणा-या विश्वनाथन आनंद आणि विश्वविजेता मॅग्नस कार्लसन यांच्यात विश्वविजेतेपदाच्या लढतीतील पहिल्या फेरीतील डाव बरोबरीत सुटला.
‘पहिल्या डावातील काही चालींमध्ये मी अडखळलो मात्र त्यानंतर मी सावधगिरीने खेळ करत फेरी बरोबरीत सोडवल्याने मी काही प्रमाणात निश्चिंत आहे. माझी सुरुवात चांगली झाली. मात्र त्यानंतर माझा खेळ थोडा मागे पडला. मात्र त्यातूनही मार्ग काढत मी योग्यप्रकारे खेळ केला आणि डाव बरोबरीत सोडवला, असे माजी विश्वविजेत्या आनंदने सांगितले.
