‘अग्नी-२’ची यशस्वी चाचणी

agni-2
बालासोर(ओदिशा) – रविवारी मध्यम पल्ल्याच्या ‘अग्नी-२’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली.

सकाळी ९.४० मिनिटांनी ही यशस्वी चाचणी ओदिशाच्या किनारपट्टीजवळ व्हिलर बेटावरून एकात्मिक चाचणी केंद्राच्या ४ क्रमांकाच्या प्रक्षेपक संकुलामधून घेण्यात आल्याची माहिती सुरक्षा प्रवक्त्यांनी दिली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणा-या या क्षेपणास्त्राचा पल्ला सुमारे २००० किमी. एवढा आहे.

क्षेपणास्त्राच्या प्रवासावर आणि त्याच्या लक्ष्यभेदावर लक्ष ठेवण्यासाठी अतिशय आधुनिक रडार, ‘टेलिमेट्री निरीक्षण प्रणाली व ‘इलेक्ट्रो ऑप्टिक’ यंत्रे आणि नौदलाची जहाजे तैनात करण्यात आली होती. १७ टन वजनाचे हे क्षेपणास्त्र २० मीटर लांबीचे असून, ते दोन टप्प्यांचे आहे. त्यासाठी घनरूप इंधनाचा वापर करण्यात येतो. सुमारे १००० किलोग्रॅम वजनाची स्फोटके २००० किमी.पर्यंत वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.

Leave a Comment