भारतीय क्रिकेट संघाची विश्वचषक तयारी ऑस्ट्रेलियात कळेल

fleming
मुंबई – न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगने भारतीय क्रिकेट संघ आगामी ऑस्ट्रेलिया दौ-यात कशी कामगिरी करतो, त्यावरुन पुढल्यावर्षी होणा-या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ जगज्जेतेपद कायम राखेल कि, नाही ते स्पष्ट होईल असे मत व्यक्त केले आहे.

१४ फेब्रुवारीपासून सुरु होणारी विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होत असल्यामुळे न्यूझीलंडलाही विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी असल्याचे फ्लेमिंगने म्हटले आहे.

त्याचबरोबर डिसेंबरमध्ये होणाऱ्या दौ-यात भारतीय संघाने कसोटी आणि एकदिवसीय स्पर्धेत चांगली कामगिरी केली तर, ते निश्चितच विश्वचषकाचे प्रबळ दावेदार असतील असे फ्लेमिंगने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलिया दौ-याच्या तीन महिन्यात भारतीय संघाने चांगला खेळ करुन, तिथल्या वातावरणाशी जुळवून घ्यावे. त्यांना वातावरणाशी जुळवून घेता आले नाही तर, त्यांना विश्वचषक स्पर्धेत फटका बसू शकतो असे फ्लेमिंगने म्हटले आहे.