इसिसने केली ३० सुन्नी नेत्यांची हत्या

isis
बगदाद – बगदादपासून पश्चिमेला असलेल्या हीथ गावात ३० सुन्नी नेत्यांची इसिसच्या दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली असून मारले गेलेले सर्व स्थानिक काबीली नेते असल्याचे, इराकच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे. या सर्वांवर इस्लामिक स्टेट संपवण्यासाठी संघटन तयार करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या नेत्यांना सार्वजनिक ठिकाणी एका रांगेत उभे करुन ठार करण्यात आले.

सुन्नी नेत्यांची प्रथम गावातून इसिसच्या दहशतवाद्यांनी परेड काढली. यावेळी दहशतवादी लाउडस्पिकरवरुन या नेत्यांना कोणती शिक्षा केली गेली हे लोकांना सांगत होते. त्यांना काफिर ठरविण्यात आले होते. त्यानंतर त्या सर्वांना गावातील रहदारीच्या रस्त्यावर एका रांगेत उभे करुन रायफलने त्यांच्यावर गोळीबार करुन त्यांच्या शरीराची चाळणी करण्यात आली.

Leave a Comment