सराव सामन्यात श्रीलंकन गोलंदाजांना रोहित शर्माने धुतले

rohit-sharma
मुंबई – ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्‍या सराव सामन्‍यात भारतीय अ संघासाठी रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. श्रीलंकेविरुध्‍द त्‍याने १४२ धावांची दमदार खेळी साकारली. १११ चेंडूंचा सामना करताना त्‍याने ८ चौकार आणि १ षटकार ठोकत १४२ रन केले. भारतीय संघाने ६ विकेटच्‍या बदल्यात ३८२ धावांचा डोंगर उभारला. इंग्लंड दौ-यावर खांद्याला दुखापत झाल्यामुळे रोहित शर्मा वेस्‍ट इंडिजविरुध्‍द खेळू शकला नव्‍हता.

रोहित शर्माच्या व्यतिरिक्त मनीष पांडेने शतक झळकवले असून त्‍याने १५ चौकार आणि १ षटकार ठोकत १३५ धावांची नाबाद खेळी केली. सलामीवीर उन्मुक्त चंदने ५४ धावांची सलामी देताना ८ चौकार आणि १ षटकार ठोकला. श्रीलंकेकडून धम्मिका प्रसादने ३ आणि लाहिरु गमागेने २ विकेट मिळविल्या.

Leave a Comment