इसिसने केला कुर्दीश ‘पोस्टर गर्ल’चा शिरच्छेद

kudrish
लंडन – काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंग साईटवर ज्या कुर्दीश महिलेची छायाचित्रे व तिच्या पराक्रमाची गाथा समोर येत होती त्या कुर्दीश महिलेला बंदीवान बनवून दहशतवाद्यांनी तिचे शीर कलम केल्याची माहिती समोर आली असून ही छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले गेले आहे.

काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराने रेहानाच्या छायाचित्रासह पोस्ट टाकली होती. त्यात लिहिले होते, ‘या रणरागिनीने कोबानीजवळ इस्लामी स्टेटच्या १०० योद्धांना ठार केले आहे. या छायाचित्राला 50 हजारांहून अधिकवेळा रिट्विट करण्यात आले होते. सीरियाच्या सीमेवरील कोबानीवर ताबा मिळविण्याचा इसिसच्या दहशतवाद्यांनी वारंवार प्रयत्न केला आहे. कुर्दीश सैनिकांच्या महिला तुकडीने गेल्या ४२ दिवसांपासून दहशतवाद्यांच्या हल्ल्यांना तोडीसतोड उत्तर दिले आहे.

Leave a Comment