६० हजार कोटींची गुंतवणूक करणार सॉफ्टबँक

combo
नवी दिल्ली : भारतामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जपानमधील आघाडीची कंपनी सॉफ्टबँक ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून ३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची जपानच्या कंपन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौ-यात सांगितले होते. त्याचाच एक भाग म्हणून सॉफ्टबँकने भारतात १० अब्ज डॉलरची म्हणजेच ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे.

सॉफ्टबँकेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मासायोशी सन आणि केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री रवी शंकरप्रसाद यांची बैठक पार पडली. या बैठकीत सन यांनी येत्या काही वर्षात भारतामध्ये १० अब्ज डॉलर रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. ‘स्नॅपडील’ आणि ‘ई-कॉमर्स’ या कंपन्यांमध्ये यातील १ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे. गुंतवणूकीसाठी सॉफ्टबँकेकडून भारतालाच प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याचे सन म्हणाले.