फेसबुक वापरकर्त्यांनो सावधान; अश्लिल कमेंट केल्यास अटक होणार

facebook
मुंबई – एखाद्या व्यक्तीची परवानगी न घेता त्याचा फोटो फेसबुकवर अपलोड केल्यास किंवा त्यावर अश्लिल कमेंट केल्यास आता जेलची हवा खावी लागणार असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगीतले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी अंकुश अग्रवाल नामक एका व्यक्तीला अटकही केली आहे.

अंकुश याने फेसबुकवर एका महिलेवरील आपला राग काढण्यासाठी बनावट अकाऊंट सुरु करुन यावर या महिलेचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोवर अनेक अश्लिल कमेंट आले होते. आरोपीने हा फोटो संबधीत महिलेसोबतही शेअर केला होता.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अंकुश याला अटक केली. फोटोवर अश्लिल कमेंट करणाऱ्यांनाही अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

Leave a Comment