निवडणूक निकालात यश येण्यासाठी आशीर्वाद द्या, पंकजाचे भावनिक आवाहन

combo
बीड – भाजपचे ज्येष्ठ आणि जाणकार नेते गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले आणि त्यानंतर त्यांच्या कन्या आणि बीडमधील तरुण नेतृत्व म्हणून पंकजा मुंडे-पालवे या राजकारणातील चमकता तारा म्हणून पुढे आल्या. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. अशावेळी पंकजा मुंडे यांनी वडिलांना उद्देशून भावनिक ट्वीट केले आहे. यामध्ये तिने म्हटले आहे की, बाबा मी सर्वोतोपरी प्रयत्न केला आहे. माझ्या आयुष्यात उद्या यश येऊ दे. त्यासाठी मला आशीर्वाद द्या. बीडमधील सर्व सहा जागा मी जिंकेन, असा मला विश्वास आहे. हेच माझे लक्ष्य आहे, असे पंकजा यांनी म्हटले आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने बीडमध्ये अनेक सभा घेऊन तसेच संघर्ष यात्रा काढून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मतदानानंतर झालेल्या विविध मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपची सत्ता येण्याचे भाकित वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे भाजपमध्येही आता मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा सुरू झाली असून पंकजा मुंडे यांचे नाव त्यात आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment