प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेकडून इंदोर – पुण्यादरम्यान विशेष गाडी

railway
मुुंबई – सणासुदीच्या कालावधीत प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाकडून पुणे ते इंदोर दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे. सोमवारी २७ ऑक्टोबर रोजी विशेष गाडी क्र ०९३१२ इंदोर पासून रात्री ८.५५ मिनीटांनी सुटणार आहे. तर दुस-या दिवशी दुपारी ३.३० वाजता पुण्याला पोहोचणार आहे. अशाच प्रकारे दुस-या दिवशी २८ ऑक्टोबर रोजी विशेष गाडी क्र. ०९३११ पुण्याहून सायंकाळी ५.२० वाजता सुटणार आहे. तर ती पुन्हा दुस-या दिवशी सकाळी ११.२० वाजता इंदोरला पोहचणार आहे . प्रवासादरम्यान ही गाडी दोन्ही दिशांमध्ये देवास, उज्जैन, नागदा, रतलाम, गोधरा, वडोदरा, भरुच, सूरत, वापी, वसई रोड, कल्याण आणि लोणावळा स्थानकांवर थांबेल.

Leave a Comment