बगदादमधील दहशतवादी हल्ला; दोन दिवसांत ७० ठार

bagdhad
बगदाद – इराकची राजधानी असलेल्या बगदादमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले अजूनही कायम आहेत. या परिसरात दहशतवादी हल्ल्याने आतापर्यंत ७० जण ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार इराकमधील गर्दीच्या परिसरात करण्यात आलेल्या कारबॉंम्ब हल्ल्याने १८ जण ठार झाले आहेत. दहशतवाद्यांनी पूर्व बगदादच्या बालादियात परिसरात प्रथम बॉम्ब हल्ला घडवून आणला. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. तर उत्तर बगदादच्या अधमिया परिसरातील दुस-या हल्ल्यात ५ जण ठार झाले आहेत. एक दिवसापूर्वी बगदादमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत ५० जण ठार झाले आहेत. तर अन्य जखमी झाले आहेत. शिया बहुल समुदायाला लक्ष्य करत इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी हे हल्ले घडवून आणल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परिसरात सरकारने कोणतीही सुरक्षा यंत्रणा तैनात केलेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलीस स्थानकांवर दगडफेक करुन आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Comment