डेनमार्क ओपन : सायना ,सिंधू दुस-या फेरीत

saina-nehwal
ओडेंसे – भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आणि पी. वी. सिंधू बुधवारी डेनमार्क ओपन सुपर सिरीज प्रिमियरच्या महिला एकेरीतून दुस-या फेरीत पोहोचल्या आहेत. लंडन ऑलंपिकमध्ये कांस्य पदक विजेती असलेल्या साइनाने संघर्षपूर्ण सामन्यात जर्मनीच्या कारिन स्कनासेला १२-२१, २१-१०, २१-१२ ने हरविले. तसेच जागतिक स्पर्धेत दोन वेळा कांस्य पदक जिंकणा-या सिंधूने हॉंगकॉंगच्या प्यूर्इ यिन यिपला २१-१२, २२-२० ने हरविले. साइनाची सुरुवात खराब झाली आणि पहिल्या गेममध्ये त्याला १२-२१ ने पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर जगातिल ७ व्या क्रमांकाच्या साइनाने शानदार पुनरागमन केले आणि दुसरा गेम २१-१० ने आणि पुन्हा २१-१२ ने जिंकला.

दुसरीकडे जगात १० व्या क्रमांकाची खेळाडू सिंधूने आपली प्रतिस्पर्धी यिन यिपला एकही संधी दिली नाही आणि पहिला गेम २१-१२ ने जिंकला. त्यानंतर सिंधूला थोडा संघर्ष करावा लागला आणि तिने दुसरा गेम २२-२० ने जिंकला. त्याआधी अश्विनी पोनप्पा आणि व्लादिमीर इवानोवची भारतीय – रशियाची मिश्र दुहेरी जोडीला हॉंगकॉंगच्या यून लुंग चान आणि यिंग सुएत त्सेने ३० मिनिटात २१-१८, २१-१८ ने मात देत, पहिल्या फेरीतून बाहेर केले. भारतीय-रशिया जोडीने असे असूनही कडवी झुंज दिली. मात्र, लहान-लहान चुकांमुळे स्पर्धेत पोनप्पा आणि इवानोवाचा प्रवास संपुष्टात आला.

Leave a Comment