भारतीय ज्युनियर हॉकी संघाने पाकिस्तानला ६-० ने हरविले

hockey
जोहोरू बारू (मलेशिया) – अरमान कुरैशीच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतीय ज्यूनियर हॉकी संघाने जोहोर चषकात शानदार गोल करत, पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला ६-० ने हरविले. मागील सामन्यात ब्रिटेनकडून ०-२ ने पराभूत होणा-या भारतीय संघाने केवळ शानदार कामगिरीच केली नाही तर, खेळाच्या प्रत्येक भागात त्यांनी चांगला खेळ दाखविला. भारत मध्यांतरात २-० ने पुढे होता. भारताकडून अरमना कुरैशीने (४९ व्या आणि ७० व्या मिनिटात) दोन तर, इमरान खान (२१ मिनिट), परविंदर सिंह (३४ मिनिट), हरमनप्रीत सिंह (५३ मिनिट) आणि वरूण कुमार (६७ मिनिट) ने एक-एक गोल केले. स्पर्धेतील भारताचा हा दुसरा विजय आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला २-१ ने हरविले होते. ते पुढील सामना गुरुवारी मलेशियासोबत खेळतील. पाकिस्तान विरूद्ध भारताची सुरुवात चांगली झाली आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ दबावात दिसत होता. भारताने त्याचा फायदा उचलत २१ व्या मिनिटात पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. पाकिस्तानी गोलकीपर मोहम्मद खालिदने पहिल्या गोलला रोखले. मात्र, इमरानच्या रिबाउंडचा त्याच्याकडे एकही उत्तर नव्हते. त्यानंतर देखील भारतीय संघ आक्रमक दिसत होता आणि परविंदरने पूर्वार्ध संपण्यापूर्वी गुरिंदर सिंहच्या क्रॉसला डिफल्क्ट करुन मध्यांतरापर्यंत भारताला २-० ने आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाने उत्तरार्धात देखील पाकिस्तानवर दबाव बनवून ठेवला होता. त्यामध्ये पाकिस्तानने अनके चांगले मूव केले. मात्र, गोलकीपर अभिनव पांडेची प्रशंसा करावी लागेल, ज्याने शानदार खेळ करत, पाकिस्तानच्या प्रयत्नांना अपयशी केले. कुरैशीने पुन्हा चांगला खेळ दाखविला. त्याने मैदानी गोल करत भारताला ३-० पर्यंत पोहोचविले आणि चार मिनिटानंतर हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये परावर्तित केले. भारतीय संघाला पेनल्टी मिळाली, ज्यावर वरूणने गोल केले. भारतीय प्रशिक्षक हरेंद्र सिंहने या विजयावर आनंद व्यक्त केले. मात्र, त्यासोबतच त्याने सांगितले की, आता देखील काही विभागांमध्ये सुधारणेची गरज आहे, असेही तो पुढे म्हणाला.

Leave a Comment