
औरंगाबाद – चिकलठाणा एमआयडीसीमधील कचराकुंडीत झालेल्या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला असून स्फोट कशाचा होता, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. कचरा उचलणार्या एका महिलेचा या स्फोटात मृत्यू झाला आहे. स्फोट एवढा मोठा होता, की त्याचा आवाज दोन ते तीन किलोमीटर परिसरात ऐकायला आल्याचे सांगण्यात येत आहे.
औरंगाबाद येथे कचराकुंडीत स्फोट, एक महिला ठार
एमआयडीसीमध्ये स्फोट झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केमिकल कंपनीच्या बाहेरील कचराकुंडीत कचरा उचलत असताना हा स्फोट झाला. कचराकुडीतील स्फोटाची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बॉम्बशोधक पथक आणि एटीएसही घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.
