
मुंबई – रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना २०१४ वर्षासाठी युरोमनी पत्रिकेने सर्वश्रेष्ठ केंद्रीय बॅंक गव्हर्नर या पुरस्काराने सन्मानित केले आहे. युरोमनीने म्हटले आहे की, राजन यांच्या शिस्तीच्या चलन विषयक धोरणामुळे संकटात सापडलेल्या भारतीय गुंतवणूक बाजारांना परिस्थितीचा सामना करता आला. युरोमनीने म्हटले आहे की, एक अब्जपेक्षा जास्त लोकसंख्येच्या देशात निष्क्रीय बाजार पुन्हा सक्रीय करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा वेळी राजन यांनी केलेले कार्य महत्वाचे आहे. रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०१४ चा सर्वश्रेष्ठ केंद्रीय बॅंक गव्हर्नर पुरस्कार त्यांना १० ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात आला आहे.
