पत्नीला ३ लाख रूपये पोटगी देण्याचा ओम पुरींना आदेश

om-puri
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांना चांगलाच दणका दिला असून पत्नी व मुलाला खर्चापोटी महिन्याला पावणेदोन लाखांऐवजी तीन लाख रूपये देण्याचे आदेश न्यायाधिश एम. एस. सोनक यांनी देताना पुरी यांची याचिका फेटाळून लावली आहे.

अभिनेते ओम पुरी आणि नंदिता यांचा कौटुंबिक वाद सुरु असून कौटुंबिक न्यायालयाने ऑक्टोबर २०१३ मध्ये ओम पुरी यांनी पत्नी नंदिताला १ लाख २५ हजार रूपये आणि मुलाच्या संगोपनासाठी महिन्याकाठी ५० हजार रूपये देण्याचे आदेश दिले होते. त्याला पुरी यांनी मुंबई न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधिश एम एस सोनक यांच्यासमोर झाली. यावेळी न्यायाधिश सोनक यांनी पुरी यांचे वार्षिक उत्पन्न तपासले व या सर्वांची लाईफस्टाईलची माहिती घेतली.

Leave a Comment