औद्योगीक उत्पादनात दर अद्यापही ०४ टक्के

make-in-india
नवी दिल्ली – देशात औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन दर अद्यापही ०.४ टक्केच आहे. निर्मिती क्षेत्र आणि ग्राहकोपयोगी वस्तु उत्पादनाच्या कमतरतेमुळे बाजाराची स्थिती खालावली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट २०१३ मध्ये देखील उत्पादन दर ०.४ टक्के एवढेच होते. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार यावेळी जुलै महिन्यतील उत्पादन दर ०.४१ टक्के होते. चालू आर्थिक वर्ष २०१४-१५ च्या एप्रिल ते आगस्ट या पहिन्यांत औद्योगिक उत्पादनात दराची वृद्धी २.८ टक्के होती. मागील वर्षी याच कालावधीत उत्पादनाची स्थिती अशीच होती. उद्योग मंडळ सीआयआयचे महासचिव चंद्रजीत बॅनर्जी यांनी सांगितले की, गुंतवणुकीत गती आणि उत्पादन मागणीच्या वाढीसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच मंजूरी देण्यात आलेल्या योजनांना कार्यान्वित करण्यासाठी गती वाढवणे गरजेचे आहे. दरम्यान त्यांनी आश्वासन दिले आहे की, मेक इन इंडियामध्ये लवचीकता आणण्यासाठी ज्या घोषणा करण्यात आल्या आहेत त्यामुळे औद्योगिक उत्पादन क्षेत्रांत प्रगती होईल अशी शक्यता आहे.