
वॉशिंग्टन – इस्लामिक स्टेट या अतिरेकी संघटनेत सहभागी होण्याकरिता रवाना होत असलेल्या एका अमेरिकन युवकाला एफबीआयने अटक केली आहे. सदर युवक हा इस्लामिक स्टेट या अतिरेकी संघटनेत सहभागी होण्याकरिता तुर्की येथे जात होता, अशी माहिती संबंधित अधिका-यांनी दिली आहे. मोहम्मद हमजा खान असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून, तो १९ वर्षांचा आहे. शिकागोमधील ओहारे आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला अटक करण्यात आली आहे.
इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी जाणा-या अमेरिकन युवकाला अटक
संबंधित अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खान याच्या निवासस्थानाची झडती घेतली असता, तेथे काही खान याने लिहिलेली काही कागदपत्रे आढळली. त्यावरुन खान हा आयएसआयएल या अतिरेकी संघटनेला समर्थन करत असल्याचे चित्र स्पष्ट होत होते. य़ा कागदपत्रांमध्ये त्याचे जिहाद आणि इस्लामिक स्टेट संघटनेविरोधातील विचार तसेच प्रवासाची योजना याबाबतदेखील माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, खान याने त्याच्या पालकांना पत्र लिहून आपण आपण अमेरिका सोडून जात आहोत आणि इस्लामिक स्टेट या संघटनेत सहभागी होत आहोत, असे सांगितले होते. तसेच त्यांनादेखील या संघटनेत सामील होण्याचे खान याने आवाहन केले होते, असे या अधिकार्याने सांगितले.
