इजिप्त लष्कराने केले १६ अतिरेक्यांना ठार

millitary
अल-अरीश – इजिप्त सैन्याच्या एका तुकडीने अल कायदापासून प्रेरीत झालेल्या अतिरेकी संघटनेतील १६ अतिरेक्यांना कंठस्नान घातल्याची माहिती इजिप्त लष्करी अधिका-याने दिली. या मोहिमेदरम्यान अन्सर बैत अल मकदिस संघटनेतील चार अतिरेक्यांना अटकदेखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या दक्षिणेकडील तीन गावांमध्ये लष्कराने अतिरेक्यांविरोधात ही मोहिम राबवली होती. इस्लामिक राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचा पदावरुन पायउतार झाल्यानंतर अन्सर बैत अल मकदिस या संघटनेने इजिप्तमध्ये अनेक अतिरेकी हल्ले घडविले होते. नुकतेच त्यांनी इस्त्राईलकरिता हेरगिरी केल्याच्या आरोपावरुन अनेक लोकांचा शिरच्छेद केला होता.