भारताच्या आठ महिला आशियातील प्रभावशाली महिला

chanda-koccher
न्युयॉर्क – ‘फॉर्चून’ या न्युयॉर्कस्थित कंपनीने जारी केलेल्या नव्या जगाला आकार देणार्‍या महिलांच्या क्रमवारीत आशिया खंडातील सर्वाधिक प्रभावशाली २५ महिलांमध्ये आठ भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला असून आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांनी क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. भारतीय महिलांमध्ये त्या प्रथम क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियातील आघाडीच्या बँकर गेल केली यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.

या क्रमवारीत भारतीय स्टेट बँकेच्या अरुंधती भट्टाचार्य चौथ्या, एचपीसीएलच्या निशी वासुदेव पाचव्या तर ऍक्सिस बँकेच्या शिखा शर्मा दहाव्या क्रमांकावर आहेत. याशिवाय, बायोकॉनच्या प्रमुख किरण मझुमदार-शॉ १९ व्या , राष्ट्रीय रोखे बाजाराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण २२ व्या, एचएसबीसीच्या नैना लाल किदवई २३ व्या आणि टॅफे कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष मल्लिका श्रीनिवासन २५ व्या क्रमांकावर आहेत.