युती टिकविण्यासाठी आज होणार शेवटचा प्रयत्न

shivsena
मुंबई- युती टिकविण्यासाठी नेत्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून पुन्हा एकदा चर्चा करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार शिवसेनेचे नेते संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई, सुभाष देसाई आदी नेते भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात दाखल झाले आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, ओम माथूर, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजा मुंडे आदी प्रमुख भाजपचे नेते उपस्थित आहेत. या बैठकीत जागावाटपाबरोबरच भाजपला शिवसेनेकडे असलेल्या किमान 10 जागा बदलून हव्या आहेत. त्यावर सेनेकडून या जागा पदरात पाडून घ्यायच्या त्यानंतर जागावाटपाला हात घालायचा व मागेपुढे करीत हा विषय संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

युती तुटू नये अशी दोन्हीही पक्षाची प्रामाणिक इच्छा आहे. मात्र, भाजपला अधिकच्या जागा हव्या आहेत. शिवसेना ते कोणत्याही स्थितीत सोडण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे तुटी तुटण्याच्या मागणीवर आहे. उद्धव यांनी शिवसेना १५१, भाजप ११९ आणि उर्वरित चार घटकपक्षांना १८ जागा देऊ केल्या आहेत. मात्र, भाजप नेत्यांनी समोरसमोर चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केल्याने उद्धव ठाकरेंनी आपल्या नेत्यांना बैठकीस पाठवले आहे. युती तुटली तर त्याचे बिल आपल्या नावावर फाडू नये यासाठी दोघांची कसरत सुरु आहे.

Leave a Comment