
कोल्हापूर – आज कोल्हापूरातून आपल्या जाहीर प्रचाराचा नारळ राष्ट्रवादी काँग्रेस फोडणार असून यावेळी जाहीर सभा घेवून राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार हे शक्ती प्रदर्शन करणार आहेत. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
शक्तीप्रदर्शन करणार राष्ट्रवादी सुप्रीमो
कोल्हापूरातील गांधी मैदानावर दुपारी ४ वाजता शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीने अधिकृत प्रचाराचा नारळ फोडला असला तरी जाहीर प्रचाराचा प्रारंभ कोल्हापूरतूनच करणार असल्याची घोषण शरद पवारांनी केली होती.
मागील ४ ते ५ दिवसांपासून कार्यकर्ते या सभेची तयारी करत आहेत. यावेळी एक लाखाहून अधिक कार्यकर्ते येणार असल्याचे स्थानिक नेत्यांनी सांगितले.
