शिक्षण विभागाच्या रडारवर दांडीबहाद्दर शिक्षक

teachers
मुंबई- वार्षिक अधिवेशनाच्या नावाखाली सुट्टी घेणा-या शिक्षकांच्या सुट्ट्यांना यापुढे कायमचा चाप बसणार असून याबाबत शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला असून, शिक्षक, शिक्षकेतर संघटनांच्या कोणत्याही अधिवेशनासाठी केवळ दोन ते तीनच दिवसांची सुट्टी यापुढे दिली जाणार आहे. त्यातही अधिवेशन केवळ उन्हाळी अथवा दिवाळी सुट्टीच्या कालावधीतच घेता येणार आहे. शाळा सुरू असताना अधिवेशनाला परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे अधिवेशनाच्या नावाखाली सहल आणि इतर कार्यक्रमांसाठी शाळा बंद ठेवणा-या शिक्षकांना आाणि त्यांच्या संघटनांनाही या निर्णयामुळे चपराक बसली आहे.

Leave a Comment