चार भारतीय इंडोनेशियन मास्टर्सच्या तिस-या फेरीत

indonesia
पालेमबॅग – अजय जयराम, बी.साई प्रणीथ, एच.एस.प्रणॉय आणि आनंद पवार या भारतीय बॅडमिंटनपटूंनी इंडोनेशियन मास्टर्स ग्रॅड प्रीक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवत पुरुष एकेरीच्या तिस-या फेरीत प्रवेश केला आहे. तिस-या फेरीत जयराम आणि प्रणीथ या भारतीय बॅडमिंटनपटूंमध्येच लढत होणार आहे.

खाद्यांच्या दुखापतीतून सावरल्यानंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये जोरदार पुनरागमनासाठी प्रयत्नशील असलेल्या जयरामने इंडोनेशियाच्या युनूसवर १३-२१, २१-१९,२१-१६ अशी मात केली. सहाव्या सीडेड प्रणीथने संघर्षपूर्ण लढतीत मलेशियाच्या कियान मेंगवर २१-१९, १८-२१, २१-१७ असा विजय मिळवला. प्रणॉय आणि आनंद पवार यांनीur आपपाल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत तिस-याफेरीमध्ये प्रवेश केला.

Leave a Comment