आता मोबाईलद्वारे एटीएममधून पैसे काढा

mobile-money
मुंबई – आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डची गरज भासणार नाही. कारण आयसीआयसीआय बँकेने अशी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे की ज्यामुळे आता मोबाईलद्वारे एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.

कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा आयसीआयसीआय बँकेने उपलब्ध करुन दिली असून मोबाईल नंबरचा वापर करुन ग्राहकांना त्यांच्या खात्यातून कोणालाही पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. विशेष म्हणजे ज्यांचे बँकेत खाते नाही अशा व्यक्तींनाही देशभरातील आयसीआयसीआय बँकेच्या दहा हजार एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.

आयसीआयसीआय बँकेच्या कोणत्याही बचत खातेधारकाला बँकेच्या वेबसाईटवर लॉग इन करुन या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

यासाठी पैसे ट्रान्सफर करणाऱ्या व्यक्तीला प्राप्तकर्त्याचे नाव, मोबाईल नंबर आणि पत्त्याची नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर पैसे ट्रान्सफर करणाऱ्या व्यक्तीला चार अंकी व्हेरिफिकेशन कोड मिळेल तर प्राप्तकर्त्याला एसएमएसद्वारे सहा अंकी रेफ्रन्स कोड पाठवण्यात येईल.

आयसीआयसीआय बँकेच्या सर्व एटीएममधून प्राप्तकर्त्याला मोबाईल नंबर, रोख रक्कम, व्हेरिफिकेशन आणि रेफ्रन्स कोड एन्टर केल्यानंतर व्यवहाराच्या दोन दिवसांच्या मुदतीत पैसे काढता येतील. कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे इलेक्ट्रॉनिक पेमेंटच्या पर्यायांमध्ये भर पडली आहे.

Leave a Comment