फेसबूकचा माफीनामा

facebook
न्यूयॉर्क – सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकने दोन महिन्याच्या मुलावरील ह्दयशस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन करणारी जाहीरात घेण्यास नकार दिल्याबद्दल माफी मागितली आहे.

केव्हीन बॉंड यांच्या दोन महिन्याचा मुलाला ह्दयाचा गंभीर आजार असून, या आजारावरील शस्त्रक्रियेसाठी ७५ हजार डॉलरचा खर्च डॉक्टरांनी सांगितला आहे. इतका खर्च केव्हीन यांना परवडणारा नसल्याने त्यांनी फेसबुकवर जाहीरात देऊन, आर्थिक मदतीचे आवाहन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ते हडसनचा हॉस्पिटलच्या बिछान्यावरील फोटो फेसबुकवर पोस्ट करणार होते. मात्र हडसनचा फोटो भितीदायक, भीषण आणि नकारात्मकता निर्माण करणारा असल्याचे सांगत फेसबुकने हा फोटो जाहीरातीसाठी देण्यास नकार दिला.

मात्र नंतर फेसबूकने केव्हीन बॉंड यांची माफी मागितली आणि निधी संकलनासाठी हा फोटो फेसबूकवर पोस्ट करण्यास परवानगी दिली. मला आणि माझ्या कुटुंबाला झालेल्या त्रासाबद्दल फेसबूकने आमची माफी मागितली आहे असे केव्हीन यांनी सांगितले.

फेसबूक आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही पोस्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. हडसनच्या शस्त्रक्रियेसाठी बॉंड कुटुंबाने आतापर्यंत तीस हजार डॉलरचा निधी जमा केला आहे.

Leave a Comment