आशियाई स्पर्धेतून ज्वाला गुट्टाची माघार

jwala-gutta
नवी दिल्ली – आगामी आशियाई स्पर्धेला भारताची दुहेरीतील बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाला दुखापतीमुळे मुकावे लागणार आहे. ज्वालाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तिला पुढील दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्यामुळे तिला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सरावादरम्यान मला गुडघ्याला वेदना जाणवू लागल्या होत्या. मात्र मंगळवारी वेदना आणखी वाढल्या. या दुखापतीमुळे डॉक्टरांनी मला पुढील १० ते १२ दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागत आहे. माझ्या कारकिर्दीत आतापर्यंत एकदाही मी दुखापतीमुळे स्पर्धतून माघार घेतलेली नाही. लवकरच मी कमबॅक करेन असे ज्वाला यावेळी म्हणाली.

२०१० आणि २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला दुहेरीत ज्वाला गुट्टाने अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले होते.

Leave a Comment