चॅम्पियन लीग स्पर्धेत नाही खेळणार रोहित शर्मा

rohit-sharma
रायपूर – आगामी चॅम्पियन लीग टी२० स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा खेळणार नसल्याची माहिती बुधवारी मुंबई इंडियन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक जॉन राईट यांनी दिली.

त्याच्या हाताच्या बोटाला इंग्लडविरुद्धच्या दुस-या एकदिवसीय सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे पुढील तीन एकदिवसीय आणि एकमेव टी२० सामन्याला त्याला मुकावे लागले होते.

चॅम्पियन लीगमध्ये रोहित शर्मा खेळणार नाही. त्याच्या जागी कोणाला खेळवावे याबाबत आम्ही पुढील २४ तासांत निर्णय घेऊ, असे राईट यांनी सांगितले.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघातील महत्त्वाचा खेळाडू असून २०१३ मधील चॅम्पियन लीगमध्ये त्याने मुंबई इंडियन्सच्या संघात महत्त्वाची भूमिका बजावली होती. येत्या १३ सप्टेंबरला शहीद वीर नारायण सिंग मैदानावर लाहोर लायन्स आणि मुंबई इंडियन्स संघादरम्यान पहिला पात्रताफेरीतील सामना रंगणार आहे.

Leave a Comment