लिबीयात लढाऊ विमान कोसळले आणि झाले कॅमेऱ्यात कैद

plane-crash
ट्रिपोली : लीबियातील तोब्रुक भागात लष्कराचे लढाऊ विमान सरावादरम्यान रहिवाशी भागात कोसळल्यामुळे वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

लिबीयन अधिकाऱ्यांकडून तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याचे सांगण्यात आले असून सध्या लिबीयाच्या बेनगाजीमध्ये दहशतवादी आणि जनरल खलिफा हिफलर यांच्या समर्थकांच्या गटात संघर्ष सुरु आहे. त्यादरम्यान हे विमान पडल्याचे म्हटले जात आहे.

या अपघाताची थरारक दृश्य एका लिबियन नागरिकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. आपण जनरल खलिफा हिफलर याचे विरोधक असल्याचे त्या व्यक्तीने म्हटले आहे.

पहा त्याच्या व्हिडीओ

Leave a Comment