बोथम यांना वाटते आहे आयपीएलची भीती

botham
लंडन – क्रिकेटपटूंना मालामाल करणा-या बीसीसीआयच्या इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेवर इंग्लंडचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेपटू इयान बोथम यांनी लॉ़डर्सवर एमसीसीच्या व्याख्यानात टीकेचे आसूड ओढले असून दीर्घकालीन क्रिकेटच्या भवितव्याचा विचार करता आयपीएल बंद झाली पाहिजे. एकूणच क्रिकेटवर ही स्पर्धा भारी पडत आहे. मला आयपीएलची भिती वाटते ही स्पर्धाच बंद व्हावी असे मला वाटते. या स्पर्धेमुळे जागतिक क्रिकेटचा प्राधान्यक्रम बदलत चालला आहे. खेळाडू गुलाम होत चालले आहेत. प्रशासक या स्पर्धेला शरण गेले आहेत अशा शब्दात बोथम यांनी आसूड ओढले.

आयपीएल दोन महिन्यांसाठी जगातील सर्वोत्तम खेळाडूंना विकत घेते आणि या खेळाडूंना क्रिकेटमध्ये आणणा-या बोर्डाला मात्र एक पैसाही देत नाही. काही प्रमाणात यामध्ये बदल झाला आहे हे मला मान्य आहे मात्र अजूनही असमतोल आहे असे बोथम म्हणाले.

भ्रष्टाचाराला आयपीएलमुळे खतपाणी मिळते असा बोथम यांचा दावा आहे. भ्रष्टाचार ही आधी समस्य़ा होतीच मात्र आयपीएलमुळे बेटिंग, फिक्सिंगला संधी मिळत असल्याचे बोथम म्हणाले. आयपीएल शिवाय जागतिक क्रिकेट अधिक चांगले बनू शकते असे बोथम यांचे मत आहे.

Leave a Comment