शरद पवारांनी काँग्रेसमध्ये परत यावे – दिग्विजय सिंह

digvijay
पंढरपूर – राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवारांनी झाले गेले सर्व काही विसरून काँग्रेसमध्ये परत येण्याचा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी दिला आहे. बिहारमध्ये नितीशकुमार व लालूप्रसाद यादव हे कट्टर विरोधक एकत्र आले आहेत त्याचप्रमाणे शरद पवारांनी काँग्रेसमध्ये येण्यास काय हरकत आहे असे सवाल उपस्थित केला आहे. दिग्विजय सिंह यांचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने धुडकावून लावला आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस व ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे बुधवारी कोल्हापूर दौ-यावर होते. राजीव गांधी यांच्या जयंतीदिन आयोजित सद‌्भावना दौड कार्यक्रमानंतर काल सायंकाळी ते कोल्हापूरहून पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला आले होते. दिग्विजयसिंह हे पंढरपूरच्या विठ्ठलांचे मागील अनेक वर्षापासून भक्त आहेत. मध्यप्रदेशच्या 10 वर्ष मुख्यमंत्रीपदी असतानाही त्यांनी पंढरपूरच्या आषाढी एकादशीचे दर्शन हुकवले नव्हते. दरवर्षी ते पंढरपूरला येतात. तसेच विविध राजकीय व सामाजिक दौ-यानिमित्त ते महाराष्ट्रात आले की आर्वजून पंढरपूरला भेट देतात. काल रात्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Leave a Comment