मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाही पाळणार प्रोटोकॉल

ajit-pawar
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संयुक्तरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री नितिन राऊत नागपूरात मोदींच्या उपस्थितीत होणा-या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही.

आज संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपूर येथील कस्तूरचंद पार्क मैदानात मेट्रो रेल्वे, पारडी आणि मानकापूर उड्डाणपूल तसेच एम्सच्या धर्तीवर सुसज्ज रूग्णालयाचे भूमिपूजन करणार असून याशिवाय एनटीपीसीच्या वीज प्रकल्पातील दोन नवीन संचांचे मोदी लोकार्पण करणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी प्राटोकॉल प्रमाणे या कार्यक्रमांना उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मात्र, हे तीनही लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबईत आज कॅबिनेटची बैठक आयोजित करण्यात आल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.

Leave a Comment