मुंबईतील मुसळधार पावसामुळे सखल भागात साचले पाणी

rain
मुंबई- दक्षिण मुंबईत पहाटे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्यायामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक मंदावली असून सकाळी साडेआठनंतर पावसाने विश्रांती घेतली असली तरी सकाळी पडलेल्या पावसामुळे परळ, एलफिन्सटन, हिंदमाता परिसरात पाणी साचले आहे. पाणी साचल्याने एलफिन्स्टन पूल, लालबाग उड्डाणपुलाजवळची वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.

दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगरात सकाळी सातच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक हजेरी लावलेल्या पावसामुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.

raiin1

वाशी टोलनाका ते मानखुर्द दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पूर्व आणि पश्चिम द्रृतगती महामार्गावरही वाहतूक मंदावली आहे. एल. बी. एस. रोड, एस. व्ही. रोड, लिंक रोड आणि बांद्र्याहून सायनकडे जाणा-या मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

आता पाऊस थांबला असून मुंबई आणि उपनगरांत ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी ऊन पावसाचा खेळ चालू आहे. या पावसाच्या सरींनी मुंबईकरांना दिलासा मिळण्याऐवजी उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

rain2
या पावसाचा रेल्वे वाहतूकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र मुंबईतील उपनगरीय गाड्या पाच ते दहा मिनिटे उशीराने धावत आहेत.

Leave a Comment